Friday, June 24, 2011

नामंजूर ....!!

या लेखाला हे वेगळंच शीर्षक देण्याचं कारण हेच कि , माणसांच्या विचारांची अभिव्यक्ती/ठेवण उलगडून सांगणे.
आपल्या संस्कृतीने आपल्याला हेच शिकवलं कि, स्वतःचं हित-अहित जाणून स्वतःच्या उद्धाराबरोबरच स्वकोषातून बाहेर पडून समष्टीचा विचार करा आणि स्वक्षमतेचा  वापर समष्टी उद्धारासाठीसुद्धा करा. आजकाल माणसं ही संस्कृती विसरू लागल्येत कि काय असा वाटतं.  प्रत्येकजण "स्व" मध्ये एवढा गुंतलेला आहे कि त्याला आपला शेजारी आजारी आहे याचीदेखील कल्पना नसते. माणसाचं माणसाशी असलेलं नातं जिवंत न राहणं ही समाजासाठी फार घटक गोष्ट ठरेल. 
  आजकाल बाहेर वावरताना असंही दिसून येतं कि, माणसांना बाह्य आकार्षानांचा फार वेड आहे. मग अगदी स्वतःच्या मुलांना pubs, Discos मध्ये पाठवणं असेल, बड्या बड्या उपाहारगृहांमध्ये जाण्यासाठी पैसे देणं असेल..अशा अनेक गोष्टी!!!! केवळ STATUS चा भाग म्हणून आजकाल पालकसुद्धा या दुष्टचक्रात अडकलेले आहेत. रस्त्यावरून फिरताना अनेक Cafes, Junk food stalls उभे राहिलेले दिसतात जिथे आरोग्यासाठी पोषक नसणाऱ्या पदार्थांची विक्री होत असते. सगळी तरुण आणि लहान पिढी तिथेच घुटमळत असते, याचं कारण घरातून पालकांकडून सर्रासपणे पैसे मिळतात आणि त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे याचे दुष्परिणाम घराघरातून सांगितलेही जात नाहीत. 
   आता समस्त समाजाने या सर्व पाश्चात्त्य संस्कृतीला "नामंजूर!" असं खडसावून  सांगण्याची गरज आहे. 
आपल्या संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे माणसाच्या जीवनपद्धतीचे परिणाम त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर होत असतात, एवढी आपली भारतीय संस्कृती या बाबतीत प्रगल्भ आहे. प्रत्येक माणूस काय खातो,पितो, कसे कपडे घालतो, कोणत्या देवतेच पूजन करतो/त्या देवतेला मानतो या सर्व गोष्टी व्यक्तिमत्वाच्या उभारणीतील महत्वाचे पैलू असतात. 
आजकाल बोकाळलेल्या या सर्व तर्हेच्या पश्चात्त्यीकारणात भारतीय तरुण पिढी ज्या प्रगल्भतेची असायला हवी तितकी दिसत नाही, याच कारण हेच कि, येणाऱ्या बाह्य आकार्शानांकडे धाव घेण्याची मनोवृत्ती आणि पालकांचा मिळणारा दुजोरा अथवा मुले आणि पालक यांमधील सुसंवादाचा अभाव! 
  स्वामी विवेकानंदानी म्हंटल्याप्रमाणे , "भारत देश हा तरुणांचा देश असून, तरुणाईच्या कर्तृत्वावरच या देशाची ओळख सातासमुद्रापार जाणार आहे." या स्वामीजींच्या विचाराला, विश्वासाला, दूरदृष्टीला प्रत्येक तरुणाने आपल्या दैवताप्रमाणे मानून, मनात सतत या विचाराची जाण ठेवून वागण्याची आणि स्वतःसाठी घातक त्याचप्रमाणे आपल्या प्रिय समाजासाठी घातक गोष्टींना "नामंजूर!!" असा ठाम इन्कार देऊन प्रगतीकडे वाटचाल करण्याची गरज आहे.
                           "मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची,
                             येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर!!!"
या ओळी या भावनेला अधिक बळ देतील असा वाटतं. 

6 comments:

  1. kharay, keval status mhanunahi nave, pan swatahachya careerchya mage lagun mulanna vel deta na yenyamule je guilty feeling yeta tyatunahi mulanche ati lad kele jatat. ani velach nahi tar savad nahi, sanvad asun visamvad asna tar pudhchach.

    kay khato, pito, devatecha pujan ya vaiyaktik babi ahet. tya babtit matra purna swatantrya asava. agdi sentimental prashna asel tar vegli goshta.. mhanje.. aaivadil mhantat mhanun ekhadi goshta na khana, upas palna, devlat vishwas nasunahi konachya mhannyakhatar darshanala jana he karayla pahijech.

    ani swatahachya uddharabarobarach samajacha uddhar he khara. pan swatahacha uddhar titkach mahattvacha. karan, ishwari yojanach ashi ahe ki pratyekala aplya mulanbaddal prem vatava. apli mula, apla sansar, mag javalche natevaik, tyanchya garja, asha tarhene kartavyachi vartula astat. apla pahanyat 95% tari ghatle pahijet. 5% samajache asa praman pahije.

    khoopach tokacha udaharan ahe.. pan tari maza mat spashta whayla madat karel. afriketlya kahi deshansathi madat magitli jate. aids aslelya ayanchi mula aidschi lagan na hota janmala yavit mhanun. ata mala he kalat nahi.. ki jyanche aivadil ha vichar karat nahit.. ki aplyach ayushyacha kahi khara nahi tar mulanna jagat anava ka.. tyanche kiti haal hotil.. ashancha samajane vichar karava ka? ani tyatunahi 90% ch yash ahe prayatnanna. hehi kharach, ki tya mulancha aaivadlanni nahi vichar kela tar konich karu naye ka? tyanchi kay chook vagaire? pan mulat samajakade limited resources astat. tenva asha kamasathi paisa dyava ki aplya mulanchya shikshanasathi thevava, thoda adhik asel tar hospitalsna dyava, ratrashalet janaryanna madat karavi ha prashna ahe. karan devsuddha swataha hat pay marnaryannach madat karto asa mhantat.. "uddharedatmanatmanam, naatmanamavasaadayet. aatmaiva atmano bandhuh, aatmaiva ripuratmanaha". heech goshta thodya far farkane saglyach social kamanna lagu padte. vel mhana, paisa mhana, aplya kutumbasathi substantial pramanat thevla gela pahije. karan jag he asa ahe, aplach na sambhalnari mansa jithe ahet.. tithe apan apli kalji ghetli nahi tar udya aplyala garjela kahi milnar nahi. ani he sagla sangtana punha mhanavasa vatta, swataha katkasrine ayushya jagnaryanbaddal mhante ahe.. jyanchyakade unchi goshtinvar udvayla paisa ahe.. tyanni tithe na udavta to samajasathi kharchalach pahije. karodonchi ghadyala ghenyaaivaji ratrashaletya mulanna madat, hospitalsna madat kelich pahije.

    pan samanya ani sansar mandnyacha nirnay ghetlelya mansane, aplya kutumbasathi puresa honyaadhi 5% peksha jasta vel, paisa samajavar kharcha karu naye.

    kadachit he farach vishayala sodun zala asel, pan halli hi goshta faar jachte ahe.. kahi na kahi karnane airanivar yet rahili ahe.. mhanun lihina zala.

    shevti ek chhotishi goshta.. roman lipit lihitana marathi devnagri ashudhha hote kadhikadhi te recheck karayla pahije. (uda. akarshanancha ha shabda) pan lekh chhan zala ahe.. vichar karayla lavnara ahe mhanun evdha vichar zala ani evdhi mothi comment takavishi vatli. baki blogla sadichha.

    ReplyDelete
  2. लेख छान झालाय. विचारप्रवर्तक (वि.प्र.) नक्कीच आहे, पहिलीवहिली प्रतिक्रियाच त्याची साक्ष देते आहे. परंतु अजूनही काही पैलू मांडता आले असते जसे वरील प्रतिक्रियेत आले आहेत. आपल्याला लेखनसीमा कुठेय? अगदी कंटाळवाणा होईल एवढा मोठा लेख नाही लिहिला म्हणजे झालं.
    .
    'उद्धरेदात्मनात्मानं' हे जरी खरं असलं तरीही हा विचार सांगायला सुद्धा कोणीतरी लागतं. स्वत्व/स्वाभिमान जागृत करायला कार्यकर्ते हवेत. शहरी भागात आणि ग्रामीण भागात ही आवश्यकता वेगवेगळी आहे. उदा. शहरातील गरीब वस्तीत पैसा अनावश्यक गोष्टींवर खर्च न करता शिक्षणाचं महत्व, अन्य गोष्टी हे समजावूनच द्यावे लागेल. टी.व्ही., नखरेल हेअरस्टाईल केलेले तरुण, बाईक, मनगटावर कडी, गळ्यात चेन्स, जीन्स, तोंडात मावा, खांद्यावर टॅटू क्वचित कानात बाली अशी दृश्ये दिसतात..आत घरात चुलीवर तवा ठेऊन चपात्या भाजणारी आई! तिथे परिवर्तन आणायला सामाजिक कार्यकर्ते हवेत. आणि असे परिवर्तन प्रयत्नांती येते.
    .
    विषयाला अनुसरून काही विचार आठवतात. रामकृष्ण परमहंस म्हणत 'नर से नारायण','शिवभावाने जीवसेवा'. स्वामी विवेकानंद म्हणत - पुढची किमान काही दशके तुमचे ते देव (शंकर, विष्णू, गणपती इ.) बाजूला ठेवा आणि भारतमाता ही एकच परमआराध्या करा. आजूबाजूला पसरलेल्या समाजात ईश्वर शोधा आणि त्या 'दारिद्रीनारायणाची' सेवा करा. याचा अर्थ स्वामीजींना नास्तिकता अभिप्रेत होती अथवा उपासना नको होती असा नाही तर कर्मकांडात/पूजापाठात अवास्तव न अडकता या दुर्बल घटकांना मदतीचा हात देऊन स्वावलंबी/स्वधर्माधिष्ठीत बनवा; कुबड्या देऊन पांगळे नव्हे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशभर चाललेले उपक्रम याचीच साक्ष देतात. गांधीजी म्हणत - there are enough resources for man's breed but not for man's greed.
    .
    वरील कॉमेंट (@ Anamika) फारच मोठी झालीये म्हणून हसता हसता ही माझी प्रतिक्रियासुद्धा फार मोठी झाली! काय करणार विषयच तसा आहे. जवळचा आणि अनुभवाचा. या विषयावर विस्तृत चिंतन आणि सामग्री उपलब्ध आहे. उदा. ग्रामाधारित विकासपथ, एकात्म मानवतावाद, गो-आधारित कृषी, स्वदेशी इ.
    .
    लेखावर प्रतिक्रिया म्हणून एवढे लिहावे वाटते यातच तो वि.प्र. झाल्याची खात्री आहे. लिहिते रहा.

    ReplyDelete
  3. जागृत सज्जनशक्ती द्वाराच हे 'परंवैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं' कार्य होणार आहे. आणि ते दुर्बल, मागास अशा घटकांचे सबलीकरण झाल्यानेच. कारण आपण जाणतो - strength of the chain lies in its weakest link. म्हणून ही कमजोर कडी ओळखून त्याला हात द्यायला हवा. तरच समाजशृंखला मजबूत राहील. अन्यथा सेवेचे पांघरूण घेतलेले पांढरे डगले आणि प्रेमाचे नाटक करणारे काळे बुरखे घाव घालायला आणि लचके तोडायला कमी करणार नाहीत.

    ReplyDelete
  4. @ vikram.. hasa, hasa tumhi.. tumhi pan tech kelat! pan patla baki tumcha. kasa ahe, jagruti mahattvachi. ti karaylach pahije. pan ajmase 5%cha bandhan thevun :)

    ReplyDelete
  5. vikram, comment vachun khup kahi shikayla milala..navin perspective milala vicharanna...THANX A LLOOOOTTT!!!!

    ReplyDelete
  6. Anamika,m happy that u wrote such a long comment on my article which inspired me to write more stuff and got various other ideas also...keep commenting..!!

    ReplyDelete